पाटण येथे नेहरू युवा केंद्राद्वारे स्वच्छता व श्रमदान कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- नेहरू युवा केंद्र युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारे पाटण येथील बजरंग बली युवा मंडळ तर्फे पाटण येथे भव्य रॅली काढून गावात ग्राम स्वच्छता करण्यात आली. व रॅली द्वारे गावात ग्राम स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्व्यक गोविंद गोरे तसेच समाज सेवा हीच ईश्वर सेवा मंडळ नायवाडा चे अध्यक्ष सुनील राठोड यांनी पाटण येथील युवा मंडळांना ग्रामस्वच्छते चे महत्व पटवून देऊन ग्राम विकासात युवकांचे योगदान याविषयावर गोविंद गोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून नवीन भारत निर्माण करण्यात युवकांनी एकत्र येण्याचे गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गावोगावी युवकांनी एकत्र येऊन गावात मंडळ बनवून गावात झाडे लावणे, स्वच्छता मोहीम राबविणे, ग्रीन गाव, स्मार्ट गाव, राबवून आपल गाव आपली ओळख निर्माण करावी असे मत यावेळी श्री. गोविंद गोरे व सुनील राठोड यांनी युवा मंडळांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पाटण येथील युवा मंडळाचे अध्यक्ष उद्देश आत्राम, सचिव युवराज बावणे पोट्टी कोटनाके, नीरज टेकाम, अमोल टेकाम, गणेश आत्राम, गणेश कोटनाके, राजेश आत्राम,तसेच आदी युवा मंडळातील सदस्य यावेळी मोठया प्रमाणात उपस्थित होते.