भद्रावती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुरज भेले यांची नियुक्ती.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी येथील सुरज मेघशाम भेले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भद्रावती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे यांनी एका पत्राद्वारे केली असून त्यांना नियुक्ती पत्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.

          या नियुक्तीमुळे शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्य अधिक बळकट होऊन पक्ष प्रमुख शरद पवार यांचे विचार शहरातील तळागाळापर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात आनंद व्यक्त केला जात असून सूरज भेले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.