सामाजिक सहभागातून रक्तदानासाठी पुढाकार घेऊन तेली समाजाने आदर्श प्रस्तावित केला.:- आमदार सुभाष धोटे.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- श्री संत संताजी जगनाडे महाराज शिक्षण प्रसारक मंडळ राजूरा ,विदर्भ तेली समाज संघटना राजुरा ,तेली समाज कल्याण मंडळ वेकोली ,तेली समाज युवक मंडळ राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी नीमीत्य भव्य रक्तदान व प्लाझमादान शिबिर संपन्न झाले. संताजी सभागृह ,गडचांदुर रोड ,सास्ती टी पॉईंट ,रामपूर -राजुरा येथे सकाळी ११ वाजता पासून शिबीराला सुरूवात झाली. उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते, राजुरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विधीवत पुजन, आरती करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी एकूण ४५ समाजबांधव ,महिलानी रक्तदान केले. रक्तदान शिबिर आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवीन्यात आले. या प्रसंगी तेली समाज बांधवांच्या वतीने समाज भवनाचे कंपाऊंड व अभ्यासिका बांधकामासाठी आमदार सुभाष धोटे यांना निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मनिष मंगरूळकर यांनी केले तर आभार बादल बेले यांनी मानले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने समाज बांधव, पत्रकार उपस्थित होते.
कोरोनाच्या जागतिक महामारी संकट काळात रक्ताची नितांत आवश्यकता आहे. तेली समाज बांधवांच्या वतीने संत जगनाडे महाराज पुण्यतिथी नीमीत्य रक्तदान शिबिर आयोजित करून खऱ्या अर्थाने संत जगनाडे महाराज यांना श्रध्दांजली वाहली आहे. तेली समाजातर्फे आयोजित या शिबिरात सहभागी समाजबांधवांनी समाजकार्या सोबतच देश कार्यात आपले योगदान दिले.रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे त्यामुळे तेली समाजाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
सुभाष धोटे,आमदार
राजुरा विधानसभा क्षेत्र ,राजुरा