डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित पहिला जागतिक महाकाव्यसंग्रह होणार प्रकाशित.
राजुरा:- २०२१ कवींच्या कवितांचा समावेश असणारा जगातील पहिलाच 'महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ' या ग्रंथात राजुरा येथील १७ वर्षीय युवा कवी आदित्य आवारी यांच्या 'बाबासाहेब' या कवितेचा समावेश करण्यात आला असून हा महाकाव्यग्रंथ शब्ददान प्रकाशन नांदेड मार्फत येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित होणार असल्याची माहिती संपादक प्रा.अशोककुमार दवणे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील अन्य कवींच्या कवितांचा देखील समावेश ह्या महाकाव्यग्रंथात करण्यात आला आहे.
आदित्यचे साहित्य विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाले असून २०२० साली अ.भा.म.साहित्य संमेलनासाठी देखील निवड झाली होती व विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताच्या जडणघडणीतील योगदान मोठे आहे. स्वलिखित कवितेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव मला करता येणे हे मी माझे भाग्य समजतो. सामाजिक बदलासाठी लिखाण करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळते.
आदित्य आवारी, युवा कवी