केंद्रिय मंत्री नामदार नितीन गडकरी गुरुवारला भद्रावतीत.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी दि. २१ जानेवारी रोज गुरूवारला १ वा.स्थानिक ग्रामोदय संघाला सदिच्छा भेट देणार आहे. नामदार नितीन गडकरी या भेटी दरम्यान केंद्र सरकार, खादी ग्रामोद्योग आयोग आणि ग्रामोदय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'स्फृर्ती' प्रकल्पांच्या सुमारे दोनशे लाभार्थी सोबत या प्रकल्पासंबंधी सविस्तर चर्चा करणार आहे. याच वेळी येथील कुंभारी कला प्रशिक्षण केंद्राच्या नविनी करणाचे सादरीकरण ना. गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. याप्रसंगी माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खादी ग्रामोद्योग आयोगाचे मुंबई व नागपूर कार्यालयातील अधिकारी आणि दिल्ली येथील तांत्रीक सल्लागार मंडळी हजर राहणार आहे. असे ग्रामोदय संघाचे अध्यक्ष जितेन्द्र कुमार यांनी कळविले आहे.