पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे दिनांक 25 जानेवारी २०२१ रोज सोमवारला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. जगाच्या पाठीवर सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. तरी पण निवडणुकीच्या टक्केवारी कडे पाहता मतदानाबद्दल मतदारांमध्ये जागृती ची गरज आहे. हे लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. भारतीय निवडणूक आयोग दरवर्षी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम आखत असतो.
अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचे नाव योग्य कागदपत्रासह मतदार यादीमध्ये समाविष्ट करतोय. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर, त्याप्रमाणे प्रमुख पाहुणे प्राध्यापक विठ्ठल चौधरी सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक सतीश पिसे सर हे उपस्थित होते. पाहुण्यांनी आपल्या भाषणात आपआपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग त्याचप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.