चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय येथील एन. सी.सी विभागातील विद्यार्थीनीचा गणतंत्रदिनी दिल्लीतील राजपथावर व २९ जानेवारी २०२१ ला होणाच्या पंतप्रधान रैलीकरिता निवड महाराष्ट्रातील दहा एन. सी. सी कॅडेस् ची निवड करण्यात आलेली आहे. या दहा विद्यार्थ्यांमध्ये सर्वोद्य शिक्षण महळ द्वारा संचालित, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येशील सिनीअर अंडर ऑफिसर ( SUO ) कु. नाजुका प्रभाकरराव कुसराम हिची निवड झालेली आहे. दिल्लीतील राजपथावर संचालन करण्याकरीता नाजुका प्रभाकरराव कुसराम या विद्यार्थीनीची निवड झाली हि बाब महाविद्यालयासाठी मोठ्या अभिमानाची आहे.
तसेच राजपथावर मागील तीन वर्षापासून महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट्स दिल्लीतील राजपथावर पथसंचालनाकरीता जात आहेत. २०१८ मध्ये SUO उज्वल वारजुरकर, २०२० मध्ये SUO निलेश अधिकारी व २०२१ मध्ये SUO कु. नाजुका प्रभाकर कुसराम या वर्षिच्या गणतंत्र दिवस संचालनात पथराजवर सहभागी होणारी नाजुका कुसराम हि सरदार पटेल महाविद्यालयाची बी.ए भाग-१ विद्यार्थीनी असून गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील एकमेव विद्यार्थ्यांनी असून तिची निवड इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
कु. नाजुका प्रभाकर कुसराम हिचे दिल्लीच्या राजपथावर व पंतप्रधान रॅली परेड करीता निवड झाल्याबद्दल हिचे सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मा. श्रीमती सुधाताई पोटदुखे, सचिव मा. प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार , एन.सी.सी. (मुले) कॅप्टन डॉ. सतिश कन्नाके, माजी एन.सी.सी. प्रमुख ( मुली) डॉ. वनश्री लाखे, एन.सी.सी. प्रमुख (मुली) प्रा. कांचन रामटेके सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच माजी छात्रसेना सिनीयर अंडर ऑफिसर युवराज दुर्वे, माजी छात्रसेना ज्युनियर अंडर ऑफिसर अकरम शेख आणि सर्व एन.सी.सी. कॅडेटस् यांनी तिचे भरभरून कौतूक केले.