सततच्या नापिकीला कंटाळून बेंबाळ येथील शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Feb 03, 2021
मुल:- मूल तालुक्यातील बेंबाळ येथील अरुण बाबुराव मोहुरले वय 45 वर्ष या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना आज ता.3 रोजी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. सदर शेतकरी सततच्या नापिकी ला व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हाताश होऊन हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. बेंबाळ पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ठावरे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.