🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वरोऱ्यात सरपंच निवडणुकी दरम्यान शिवसेना कांग्रेस मध्ये "राडा"


Bhairav Diwase.     Feb 12, 2021
वरोरा:- सरपंच पदासाठी बोरगाव शिवणफळ येथे काँग्रेस आणि शिवसेनात काट्याची लढत होती यामध्ये काँग्रेसचे सरपंच संताराज कुळसंगे विजयी ठरले.

बोरगाव शिवणफळ हे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे काँग्रेसचा सरपंच बसल्याने शिवसेना समर्थक नाराज झाले. यादरम्यान बोरगाव शिवनफळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटात तू तू मै मै झाल्याने वादाचे रूपांतर भांडणात झाले. काही शिव समर्थक समजल्या जाणाऱ्या तरुणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगड मारल्याने हा वाद चिघळला. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते वरोरा येथे रवाना झाले. यानंतर पाच वाजताच्या दरम्यान शिवसेना कार्यकर्ते व नितिन मत्ते यांच्या शरयू हॉटेलमध्ये बसून होते. यानंतर काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी शरयू हॉटेलमध्ये येऊन गावात झालेल्या दगडफेकीत बद्दल विचारणा करीत जिल्हाध्यक्ष नितीन मते यांना घेराव करून मारहाण करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या घटनेची माहिती एसडीपीओ निलेश पांडे यांना मिळताच ते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. जिल्हाप्रमुख नितीन मध्ये यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन वरोरा येथे घेऊन आले. यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवत समज देण्यात आली . यामुळे पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गटातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदर घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे वरोरा पोलीस स्टेशन येथे दाखल झाले. कांग्रेस-सेना पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात तक्रार न दिल्याने हा वाद शमला.