रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    March 20, 2021
चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी-नवरगाव मार्गावर नेरी येथील केवळराम कामडी यांच्या घरासमोर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात आज शनिवारी दि 20 मार्चला सायंकाळी 5 वाजता सुमारास जोरदार अपघात झाला यात ट्रॅक्टर ने दुचाकी स्वाराला जागीच चिरडले यात दुचाकीस्वार डोक्याचा भाग चेंदामेंदा झाल्याने जागीच ठार झाले तर मागे बसलेला दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे हे मोटेगाव येथील रहिवासी असून गोकुलदास मेश्राम आणि दिवाकर दडमल हे दोघे जण आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 34 बी क्यू 9778 ने नेरीला कामानिमित्त येत असताना आणि नेरीवरून नदी घाटावर अवैध रेतीची तस्करी करण्यासाठी सुसाट वेगाने जात असलेले बिना नंबरचे ट्रकटरने नेरी -नवरगाव रोडवर केवळराम कामडी यांच्या घरासमोर जोरदार धडक दिली आणि यात दुचाकी स्वार गोकुलदास मेश्राम यांच्या डोक्याला चेंदामेंदा झाल्याने तो जागेवरच ठार झाले तर माघे बसलेले दिवाकर दडमल याना गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    सदर घटना घडताच ट्रॅक्टर चालक फरार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस स्टेशन चे पी एस आय शेख आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले प्रताचे पंचनामा करून तपासणी साठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.