धानापूर येथील कापूस जिनींगला आग.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.  March 04, 2021

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील कापूस जिनींग ला आज १२:३० च्या सूमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र वित्त हानी खुप झाली आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.


सदर कॉटन इंडस्ट्रीज ही प्रेमलता गोनपल्लीवार आणि आनंदीदेवी सारडा यांच्या मालकीचे आहे. आग विजवण्यासाठी पोंभुर्णा, राजुरा, चंद्रपूर येथील अग्निशामक दलाला आमंत्रित केले असून आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे.