Chandrapur : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम; शुक्रवारी कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार 01 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 वाजता पत्रकार दिन व कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.वरोरा नाका पत्रकार संघाचे कार्यालय येथे आयोजित सोहळ्यात वरोरा येथील जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व बल्लारपूर येथील जेष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,उ‌द्घाटक व मार्गदर्शक म्हणून दैनिक नवराष्ट्रचे वृत्त संपादक डॉ.प्रा.गणेश खवसे व प्रमुख अतिथी म्हणून सिडीसीसी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केले आहे.