लॉकडाऊन बद्दल राज्यसरकारचा व्यापारी असोसिएशन तर्फे जाहीर निषेध.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना असोशि
कोरपना:- कोरोना महामारीची दुसरी लाट झपाट्याने वाढत असून अनेक कोरोना रुग्णाचा मृत्यदर दिवसेंदिवस वाढतच आहे, याच हेतूला पुरून आणखी एकदा राज्यसरकारने ६ एप्रिल पासून तर ३० एप्रिल पर्यन्त कडक लोकडाऊन चा निर्णय घेतला यामुळे राज्यात व्यापारी वर्गा मध्ये संतापाची लाट पसरली आहे राज्यात अनेक जिल्ह्यात तालुक्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
गडचांदूर शहरातील व्यापारी असोशियन व्यापाऱ्यांची छोटेखानी सभा घेऊन राज्यशासनाचा जाहीर निषेध केला तर राज्य सरकार ने पूर्ण वेळ बंद न लावता काही तास व्यापाऱ्यांना दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात यावी असे मत व्यापारी असोशियचे अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी केली सर्व व्यापारी यांनी एकमताने दुकाने खुली करू जर आमच्या गुन्हा दाखल झाला तरी चालेल आम्ही तयार अहो पण आम्ही दुकाने बंद करणार नाही अशी प्रतिक्रिया बघायला मिळाली या नंतर अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने उघडण्यास सुरवात केली या ठकाणी व्यापारी वर्गाचे पदाधिकारी हेमंत वैरागडे, धनु छाजेड, जुबेर रजा, काशिनाथ चुने, पंकज वैद्य, इशांत चौधरी , आशिष रोकडे दिनेश पत्तीवार , अनेक व्यापारी वर्ग उपस्थित होता