भू-वैकुंठ अड्याल टेकडीवरील भव्य गुढीपाडवा महोत्सव या वर्षी रद्द.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:-  दि. १३ एप्रिल २०२१ ला श्री गुरुदेव आत्मनुसांधन भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील गुढीपाडवा महोत्सव रद्द करण्यात आला. भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे गेल्या कित्येक वर्षांपासून साजरा होणारा गुढीपाडवा महोत्सव या वर्षी कोविड-१९ मुळे जिल्हा प्रशासन व राज्य सरकारच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेला असून भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील यात्रा व होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
  
      सर्व भाविक भक्तांनी व श्री. गुरुदेव मंडळींना विनंती करण्यात येते की, सर्वांनी आपापल्या घरीच गुढीपाडवा साजरा करावा. असे श्री. गुरुदेव आत्मनुसंधान भू - वैकुंठ व्यवस्थापन तर्फे जाहीर आव्हान करण्यात आले आहे. भाविक मंडळीनी भू-वैकुंठ अड्याळ टेकडीवर न येऊन गर्दी टाळून सहकार्य करावे. व श्री. गुरुदेव चरणी प्रार्थना करावी की कोविड-१९ ही जागतिक महामारी दूर व्हावी.