Click Here...👇👇👇

लखमापुर बोरी मधील युवकांनी केले रक्तदान.

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- वाढत्या कोरोनामुळे रुग्ण संख्येत सतत वाढ होत आहे यात कोरोनाव्यतीरिक्त अन्य रुग्नाचे सुद्धा रक्ताविना हाल होत आहेत. त्यासाठी गरजूंना रक्ताची मदत व्हावी यासाठी लखमापुर बोरी येथील युवकांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिरात १५ युवकाणी रक्तदान करून मदतीचा हात दिला. या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक केलं जातं आहे .
राज्यासह जिल्ह्यातच कोरोना साथ झपाट्याने पसरत चालल्यामुळे सर्व कोरोना रुग्न हे शासकिय रुग्नालयात जात असतात अनेकांना रक्ताची गरज असते गरिबांना आर्थिक अडचणीमुळे रक्त विकत घेता घेऊ शकत नाही त्यामुळे लखमापुर बोरी येथील युवकानी गंभीर दखल घेत स्वतापासून रक्तदाणाची सुरुवात करुन दुसर्याना रक्तदान करावे असे प्रोत्साहन करण्यासाठी आज 20 एप्रिल 2021 ला येथील भगवंतराव हायस्कूल लखमापुर बोरी या शाळेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केली.

 शिबिरात १५ युवकांनी पुढाकार घेत रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे आयोजन अतुल बारसागडे (ग्रा. पं. सदस्य लखमापुर बोरी ) व नेमाजी घोगरे यानी केले. व  रामकृष्ण झाडे, किशोर नागपुरे, अतुल बारसागडे ,श्रीकृष्ण वैरागडे, मंगेश वासेकर ,श्रीकृष्ण बारसागडे ,साईनाथ सातपुते , दिलखुश बोदलकर,  नेमाजी घोगरे , श्रीकृष्ण बोदलकर  यांनी रक्तदान केले.  आनि  रक्तसंक्रमन करण्यासाठी  डॉ अंजली साखरे BIO, सतीश तटकलावार, स्वप्नील चापले तंत्रज्ञ, सूरज चांदेकर, प्रमोद देशमुख आदी  गडचिरोली येथील रक्तसंक्रमन विभागाची टीम (चमू) उपस्थित होती रक्तदान शिबिर  यशस्वी पार पाड़न्यासाठी  गावातील युवक व भगवंतराव हायस्कूल  विद्यालयाचे  कर्मचारी श्री.शिवणकर सर. श्री. वाळके सर , शेंडे सर , गुडपल्ले चपराशी , वन्नेवार सर  बोरीकर सर या कर्मचार्यानी सहकार्य  केले. आयोजकाने सर्व रक्तदात्याचे आभार व्यक्त केले.
 
      कमी वेळा मध्ये च शिबिराला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याने येत्या काही दिवसांत रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी केले आहे.