Click Here...👇👇👇

गोरजा येथे श्रमदानातून मंदिराचे बांधकाम.

Bhairav Diwase
0 minute read

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथून जवळच असलेल्या गोरजा येथे प्रल्हाद गायकवाड यांनी गुरूदेव सेवा मंडळाला सार्वजनिक कामाकरीता जागा दान दिलेली आहे. या जागेवर श्रमदानातून प्रार्थना मंदिराचे काम सुरू आहे.

या कामाकरीता गावातील गुरूदेव सेवा मंडळ, न्यू आझाद क्रिडा मंडळ, सरपंच अरूण टेकाम, संजय अतकरी, प्रमोद कावरे, बाळा अतकरी, अरूण ठेंगणे, गजानन डोंगे, युवराज मत्ते, रमेश बोबडे, मनोज गायकवाड, प्रकाश वाघमारे, रविंद्र नांदे, बालाजी बलकी, गावातील युवक मंडळ या श्रमदानामध्ये सहभाग घेत असून हे कार्य पूर्णत्वास नेण्यास तन मन धनाने सहकार्य करीत आहेत.