Top News

नेत्यांची निवडणुकीतील आस्था कोरोना काळात जाते कुठे?

Bhairav Diwase. April 28, 2021
वर्षातून फक्त एकदा येणारी दिवाली. निवडणुका आल्या तर वर्षातून दोनदा तर कधी तीनदा पण येते. दिवाली आली तर आनंद, भरभराट, खुशी, खरेदी दुसरं काय तर मज्जाच मज्जा.....
निवडणुका लागल्या की रस्त्यांवर, घरांवर बॅनर, पापंलेट आणि भारदस्त आवाजातील डिजे (DJ) तसेच लाऊड स्पीकर यांनी गावातील वातावरण गजबजून आणि भरभरून जाते त्या 15 दिवसच्या काळात जणू जत्राच भरते. आणि या निवडणुकीत मी निवडून आलो तर गावातील प्रत्येकाच्या समस्या संपविणार अशी आस जणू जनतेला देतात.सोबतीला धाब्यावर इच्छुकांना कोंबडे-बकरे यांचं स्वादिष्ट जेवण आणि त्याला जोड ताण कमी करणार पेय (मद्य) याने 15 दिवस अगदी दिवाळीच्या तिखट-गोड जेवणासारखे निघून जाते.
या काळात डझनभर उमेदवारांना आपली मदत आणि आपला उद्देश घरातील प्रत्येकापर्यंत जावा ही माफक अपेक्षा असते. मात्र आजच्या या महामारीच्या(कोरोना) काळात जनतेमध्ये खूप भीतीच वातावरण असल्याने गावातील परिस्थिती खूप विदारक होत चालली.
आज जनतेला दुसरी मदतीची अपेक्षा नाही तर निवडणुकीच्या काळात जसे प्रत्येक उमेदवार आपले मतदार चिन्ह,बॅनर,दुपट्टा, साळी-चोळी ,अथवा पॉकेट यासारखे मदत आपल्या मतदार क्षेत्रात जशी प्रत्येक गावात-घरात-मतदारांना पोहचेल याची सुलभ काळजी घेतात.
जणू माझा मतदार -माझा देवता ही संकल्पना निवडणूक काळानंतर का मरून जाते. कोरोना सारखी महामारीच्या काळात आज खरी जनतेला गरज आहे ती जागृतीची..आज ग्रामीण-शहरी अक्षरशः घाबरलेला आहे त्यांना आज गरज आहे ती धीराची.
                   
       वास्तविक आज जनतेला गरज आहे ती निवडणुकीच्या काळात आपण जसे जनसेवेसाठी तत्पर असतो त्या पितृत्व भावनेची मात्र ती भावना आज दिसत नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मदतीची सरकार कडून मदत करण्याची मागणी करताना हेच समाजसेवक करत आहे.
       
      मात्र सध्या जनतेला साहजिक पडलेला प्रश्न आहे किंबहुना लोकांच्या मनातला सूर उमटताना दिसतो की जसा मतदानाच्या दिवशी प्रत्येक गावात बूथ मंडप टाकतो तसा  रुग्णालयाबाहेर किंवा गावात कोरोना जागृती संदर्भात वा मदतीसाठी स्वतःच्या किंवा आपल्या नेत्याचे फोटो लावून मंडप लावून कोविड सम्पर्क कार्यालय का सुरू करत नाही जेणेकरून जनतेस योग्य त्या आरोग्य सुविधा देण्यास मदत करण्यास मदत होईल. लस उपलब्ध करून ऑटो किंवा अंबुलन्स मधून लसीकरणाठी  केंद्रावर नेऊन मदत करावी.
      
         अशा माफक अपेक्षा फक्त जनतेला आहे. मात्र हे राजकीय लोक मतदार राजा मत मारण्यापूर्ती वापराची वस्तू नसून तीही मन, भावना, सुख, दुःख असणारे आपल्याच देशातील जनता आहे. ती फक्त साधी, भोळी व स्वार्थ नसलेली आपलीच लोक होय.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने