🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

नवरगाव ग्रामपंच्यातचे अजब कारभार.

बोटावर मोजण्या इतक्या घरी केले सॅनिटायझर फवारणी.

अनेक महिन्यापासून डासांची फवारणी नाही.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- नवरगाव हे सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंच्यात म्हणून ओळखली जाते. मात्र या गावातील ग्रामपंचायतचा शून्य नियोजन असल्यामुळे गावात सगळी कडे नाराजी पसरली आहे. कोरोनाच्या काळात जे लोक पॉजिटीव्ह आले आहेत अश्यांच्या घरी जाऊन सॅनिटायझर करणे बंधन कारक केले आहे. मात्र नवरगावच्या ग्रामपंच्यात मध्ये फक्त काही लोकांच्या घरी जाऊन सॅनिटायझर ची फवारणी करून हातात हात धरून बसून आहेत. जेव्हा हि माहिती सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षाला माहिती झाली तेव्हा त्यांनी ग्रामपंच्यातला विचारपूस केली असता त्यांनी म्हटले कि जिथे कोरोना रुग्ण आहे त्यांच्या घरी फक्त आम्ही कर्मचारी पाठवून सॅनिटायझर करत आहो. पण हि गोस्ट पूर्णपणे खोटी आहे कारण स्वता सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष्य अमोल निनावे हे या 20 दिवसा पासून कोरोना पॉजिटीव्ह होते आणि त्यांनी पूर्णपणे वॉट्सअप आणि फेसबुक च्या माध्यमातून माहिती दिली असून सुद्धा त्यांच्या घरी कोणीच विचारपूस किंवा सॅनिटायझर कराला गेले नाहीत. तसेच ती न्यूज बघितल्यावर अनेक लोकांची माहिती घेतली असता त्यांनी स्पस्ट म्हटले कि याबाबत तर आम्हच्याकडे पण कोणी आले नाही आम्ही तर पॉजिटीव्ह होतो. यावरून अस लक्ष्यात येते कि ग्रामपंच्यात आता तोंड पाहून तर काम करत नाहीत. कारण ग्रामपंचायतची जीमेदारी आहे कोरोना पॉजिटीव्ह च्या घरी जाऊन सॅनिटायझरिंग करणे मात्र इथे फक्त मोजक्याच घरी जाऊन करताना दिसत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. तसेच नवरगाव मध्ये डासांचे प्रमाण वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव पण वाढला आहे. तरीपण गावात अजून एकदा पण डासांची फवारणी झाली नाही. यावरून अस लक्ष्यात येते कि या गावाची सुरक्षा जर ग्रामपंच्यात नसेल करत तर मग कोण करणार. त्यामुळे वरिष्ठ प्रशाशनाने याकडे त्वरित लक्ष्य देणाचे करावे अशी मागणी नवरगाव वाशीय जनतेकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत