Top News

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून सावली तालुक्यासाठी 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर.

माजी आमदार अतुल देशकर यांचा पुढाकार.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- केंद्रीय मंत्री, भाजपा नेते मा.ना.नितीनजी गडकरी यांच्या कडून सावली तालुक्यासाठी 5 ऑक्‍सीजन कॉन्संट्रेटर उपलब्ध झाले. याचे वितरण ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.
सावली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत शासन व प्रशासनाची यंत्रणा कमी पडत असतांना ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर करून देण्याची मागणी केली. अतुल देशकर यांच्या विनंतीला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी सावली तालुक्यासाठी 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिले.
सावली येथील कोरोना केयर सेंटरसाठी 3 व पाथरी येथील कोरोना केयर सेंटर साठी 2 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यात येणार आहे. आज ब्रह्मपुरी येथील विश्रामगृहात ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सदर 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सावली पं. स चे माजी उपसभापती तुकाराम पा. ठिकरे, पाथरीचे उपसरपंच प्रफुल तुम्मे, शरद सोनवाने यांना सुपूर्द केले.
नितीनजी गडकरी ब्रह्मपुरी विधानसभेसाठी या परिस्थितीत देवदूत आहेत असे सांगत प्रा.अतुल देशकर यांनी नितीनजी गडकरी यांचे आभार मानले. तसेच या मध्ये आमदार प्रवीण दटके व नागपूर नागरीक सह. बँकेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असलेल्याचे ही माजी आमदार अतुल देशकर यांनी सांगितले आहे.
या प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्य. सदस्य प्रा.प्रकाश बगमारे, भाजपा नगर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, युवा मोर्चा नगर महामंत्री स्वप्नील अलगदेवें, नगर सोशल मीडिया प्रमुख ललीत उरकुडे उपस्थित होते.
सावली तालुक्यातील जनतेसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी आमदार अतुल देशकर यांचे भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, माजी जि.प सभापती संतोष तंगडपल्लीवार, महामंत्री सतीश बोंम्मावर, जि.प सदस्या योगिता डबले, जि.प सदस्या मनीषा चिमुरकर, भाजपा शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, पं. स उपसभापती रवींद्र बोलीवार, राकेश विरमलवार, राकेश कोंडबत्तूंवार यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने