तालुका महामंत्री छबिलाल नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टरांना फेसगार्डचे वितरण.

Bhairav Diwase
तालुका महामंत्री छबिलाल नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टरांना फेसगार्डचे वितरण.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी राजुराचे तालुका महामंत्री छबिलाल नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि. 21 मे 2021 रोज शुक्रवारला भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ डोहे यांच्या नेतृत्वाखाली चुनाळा येथील डॉ. पंदिलवार यांना फेसगार्ड वितरण करण्यात आले.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामध्ये डॉक्टरांना याचा जास्त सामना करावा लागत असतो. त्यामुळे डॉक्टरांचा सुरक्षितेसाठी फेसगार्ड देऊन हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ डोहे यांनी छबिलाल नाईक यांना N95 मास्क देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


त्याप्रसंगी भाजयुमो विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, तालुका अध्यक्ष राहुल थोरात, शहर महामंत्री अजयकुमार श्रीकोंडा, राहुल जगत आदी उपस्थित होते.