(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- बल्लारपूर शहरातून मूल कडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एमएच 40 बीएल 5939 ने बायपास रोडवरील कामगार चौकात अचानक पेट घेतल्याने ट्रक पूर्णपणे राख झाला.
भंडारा येथील साकोली तहसील निवासी वाहन चालक 33 वर्षीय विनोद किरणापुरे पोह्याने भरलेला ट्रक मूल कडे नेत असतांना काही वेळ विश्राम करण्यासाठी विनोदने ट्रक बायपास रोडवर झाडाखाली लावला मात्र ट्रक मध्ये अचानक वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रक ने पेट घेतला.
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या मात्र तोवर ट्रक मधील पोह्याने भरलेल्या बॅग व ट्रक जळून खाक झाला. आगीच्या या तांडवाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.