(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:-माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील सगणापूर येथील जिओ चे नामे कृष्णाजी पुल्लेवाड यांच्या मालकीच्या शेताततील टॉवर गेल्या तीन वर्षांपासून शोभेची वस्तू ठरले आहे.उन्हाळाभर येणाऱ्या वादळी पाऊसाने व ढगाळ वातावरनाने आंबेझरी येथील जिओ च्या टॉवरचे कव्हरेज कमी केल्याने या क्षेत्रातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येणाऱ्या पावसाळ्याचा विचार करता ढगाळ वातावरणाचा विचार करून तसेच सततच्या पावसाने आंबेझरी येथून आणखीन जिओ च्या टॉवर चे कव्हरेज कमी केले जाण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने लोकांमध्ये बोलल्या जात आहे.तसेच पाहडावरील डोकेदुखी ठरलेल्या सतत च्या विजेच्या लपनंडावाने कव्हरेज कमी केल्याने लोकांना याचा दुहेरी त्रास सहन करावा लागणार आहे.सदर टॉवर हे ठेकेदाराने चुकीच्या ठिकाणी उभारल्याने या टॉवर ला कुठलेही लोकेशन मिळत नसल्याने सदर टॉवर हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून धुळखात पडले आहे. नंदप्पा,झालीगुडा आनंदगुडा, भोक्सापूर, सगणापूर, येल्लानगर, गोंदापूर, कोलांडी, पिट्टीगुडा, शंकरपठार, गोडंकप्पी, कोलामगुडा, शायलूगुडा, इत्यादी गावांना या जिओ च्या टॉवर चा कोणताही फायदा होत नसल्याचे या गाववशियाकडून बोलल्या जात आहे.