Top News

कोरोनाच्या संकटकाळात देवदूत म्हणून धावुन येणाऱ्यांचे गजानन भोपये यांनी मानले आभार.




(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे असणारे राहवासी गजानन श्रावण भोपये यांना अनेक दिवसांपासून कोरोनाचीं लागण झाली होती. तसेच आज घडीला ते कोरोनावर मात करून सुखरूप घरी पोहोचले.
जेव्हा गजानन भोपये यांना कोरोनाने ग्रासले होते तेव्हा चुनाळा गावचे सरपंच श्री बाळनाथ वडस्कर यांनी त्यांचा घरी भेट देऊन त्यांना ग्रामीण हॉस्पिटल राजुरा मधे भरती केले.
भरती केल्यानंतर माजी आमदार श्री सुदर्शनजी निमकर साहेब आणि बाळूभाऊ यांनी त्यांना सकारात्मक विचार करण्याकरिता रोज प्रेरित केले तसेच निमकर साहेब आणि बाळूभाऊ यांनी डॉक्टर लांजेवार सर यांना संपर्क करून त्यांचे प्राण वाचवले व त्यांना पुनःजीवन दिले असे त्यांनी सांगितले. तसेच आज कोरोनावर मात करून सुखरूप घरी पोहोचन्याकरिता निमकर साहेब, बाळूभाऊ वाडस्कर तसेच गावतील हॉस्पिटल मधे नर्स म्हणून कार्यरत असलेली कु सुप्रिया पायपरे यांनी त्यांना खुप सहकार्य केल्याबद्दल या सर्वांचे गजानन भोपये यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने