पोंभुर्णा:- पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचा दुरूपयोग करू नये. पाण्याचे मानवी जीवनातील महत्व हे अनन्यसाधारण आहे. मानवी आरोग्य व्यवस्थित जपण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन हे खुप महत्वाचे आहे. त्यातील महत्वाचे म्हणजे पाणी शुद्धिकरन करणे, पाण्याचे अपव्यय थांबवणे.
त्यातच गावात आर. ओ. संयंत्र असल्यामूळे पाण्याची ने आन करण्यासाठी पाणी कॅन ची गरज आहे हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत फुटाणा ने पाणीपट्टी, घरपट्टी निरंक असलेल्या लोकाना सन २०२०-२१ मधील १४ व्या वित्त आयोगामधुन एकुण २४७ कुटुंबाना पाणी कॅन चे वाटप करण्यात आले. अशाच पद्धतीने प्रत्येक कुटुंबाने ग्रामपंचायतचा कर हा नियमित भरून गाव विकासासाठी हातभार लावावा असे मत ग्रा. पंचायत फुटाणा चे सरपंच सौ. संगिता तेलसे, उपसरपंच नैलेश चिंचोलकर, तसेच सर्व सदस्य व संगणक चालक यांनी आधार न्युज नेटवर्क चे तालुका प्रतिनिधी किशोर माहोरकर यांचेशी बोलताना व्यक्त केले.