चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी तथा ओबोसी मोर्चा भाजपाच्या वतीने येत्या २६ जून २०२१ ला आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्य संपूर्ण महाराष्ट्रात ओबोसी समाजाचे आरक्षण रद्द केल्यामुळे भाजपाचे माजी वित्त मंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्य मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनात रस्तारोको कार्यक्रम आयोजित केले आहे. या महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या केसमध्ये या १५ महिन्यात काहीच लक्ष दिले नाही. वकिलांची फौज उभी केली नाही व ईपोरीयल डाटा सादर केला नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण रद्द केले. याला जबाबदार व बेफिकरी महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारच्या विरोधात रस्तारोको आंदोलन करायचं आहे.
ओबीसी समाजाच्या सर्व क्षेत्रातील जनतेला कळविण्यात येते कि, हे या सरकारनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून पुढे येणारे युवा वर्ग, पुढारी, नेते तयार होऊ नये जसे कि, ग्रा. पं. सदस्य असो कि सरपंच, पं. समिती सदस्य असो कि सभापती, जि.प. सदस्य असो की अध्यक्ष हे होऊ नये कि काय? म्हणून अस षड्यंत्र या सरकारनी तयार केले आहे. माझ्या बांधवानो आम जनता आधी आजी-माजी सरपंच, सभापती, अध्यक्ष (जि.प) नगराध्यक्ष, महापौर अशा एक नाही तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रात सुद्धा आपण ओबीसी आरक्षणाच्या आधारे अनेक पद भूषविले होते व आहोत हे पद भूषवित असताना अनेक उदाहरण आहेत कि सामान्य गरीब परिवारातला व्यक्तीसुद्धा या आरक्षणाच्या आधारे पद भूषवित आहे तेही आर्थिक मजबूत व्यक्तीलासुद्धा मागे पडावे लागत आहे केवळ आणि केवळ आरक्षणाच्या आधारे हे होऊ शकते. पण माहिती नाही सामान्य कुटुंबातला व्यक्ती आरक्षणाच्या आधारे अनेक पद भूषवित समोर गेले आणि हे या सरकारला पचनी नाही पडले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दि.४ मार्च २०२१ रोजी ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरविले. यापुढे शैक्षणिक, सामाजिक आरक्षण रद्द करायला हे सरकार मागे पुढे बघणार नाही.
या करीता ओबीसी समाजाच्या अनेक संघटनांनी या लढ्यात सामील होऊन मतभेद, पक्षभेद सर्व विसरून एकत्र लढूया आणि हक्काच असलेल आरक्षण मिळवण्याकरिता दि २६/०६/२०२१ रोज शनिवारला रास्तारोको आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने बामणी ता. बल्लारशा, पडोली ता. चंद्रपूर, आनंदवन चौक वरोरा, नागभीड, ब्रम्हपुरी, चिमूर या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी पत्रकार प्रेस नोटच्या माध्यमातून केली आहे.