Top News

जिल्हानिधी योजना जि. प. चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती भद्रावती महिला बचत गटांना दरीपंजी चे वाटप.

पंचायत समिती परिसरात जि. प. सदस्या सौ. अर्चना नरेंद्र जिवतोडे यांच्या हस्ते वृक्षरोपन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
भद्रावती:- जिल्हानिधी योजना जि. प. चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती भद्रावती महिला बचत गटांना दरीपंजी चे वाटप करण्यात आले. दि 24/6/2021 रोजी पंचायत समिती भद्रावती येथील सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे, जि. प. चंद्रपूर सदस्या सौ. अर्चना नरेंद्र जिवतोडे, विशेष अतिथी जि. प. सदस्य यशवंत वाघ उपस्थित होते.
तसेच चिंतामण आत्राम सदस्य पंचायत समिती भद्रावती, मंगेश आरेवार ग. वि . अ. न, सुशांत गाडेवार कु . अ पंचायत समिती भद्रावती उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सदर दरीपंजी चा वापर महिला सभा, महिलांचे कार्यक्रम या साठी करून बचत गट समक्ष करावे असे आव्हाहन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील महिला बचत गटांना दरी पंजी चे वाटप करण्यात आले. वटपौर्णिमेचे औचित्य बांधून पंचायत समिती परिसरात जि. प. सदस्या सौ. अर्चना नरेंद्र जिवतोडे यांच्या हस्ते वटवृक्ष, कडुनिंब वृक्षांचे रोपन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने