मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे जागतिक योगा दिवस साजरा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे आणि तालुका सहायक अधिकारी नितेश मालेकर यांच्या मार्गदर्शनात जागतिक योगा दिनानिमित्ताने चंद्रपूर तालुक्यातील नागाडा म. , गोंडसावारी, पिंपडखूट, अजयपुर चीचपल्ली, चेकनिंबाडा, बोर्डा, लोहार, जुनोना, या गावांमध्ये योगा दिवस साजरा करण्यात आला.
कोविड सारख्या परिस्थितीत सुध्दा विद्यार्थांना योगा चे महत्व पटवून देण्याकरिता मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चा हा उपक्रम आहे. हा उपक्रम पार पाडण्याकरिता शाळा सहायक अधिकारी कू. नालंदा बोथले यांनी मेहनत घेतली. तसेच समूदाय समन्वयक म्हणून मीनल दोडके, प्राजक्ता दुर्योधन, अश्विनी गौरकार, सुलभा जुमनाके, राणी कवाले, माधवी पिल्लरवार, हेमलता पेंदाम, सचिन दोर्लिकर, प्रेम जोरपोतवार यांनी सहकार्य केले.