🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दालमिया सिमेंट कंपनीत कंत्राटी कामगाराचा ऊंचीवरून पडून मृत्यू. #death


कुटुंबाला आर्थिक मदत व कुटुंबातील एकाला स्थायी नौकरी साठी सर्वपक्षीय एकवटले.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत उंचीवर काम करीत असलेल्या एका कंत्राटी कामगाराचा ऊंचीवरून पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान घडली. मृतक कामगाराचे नाव संतोष चव्हाण वय 28 रा. नांदा फाटा आहे असे सांगितले जात आहे.

नारंडा येथील दालमिया सिमेंट प्लांट मधे आज दुपारी उंचीवर संतोष चव्हाण नामक कंत्राटी कामगार काम करीत होता. तो अचानक खाली पडल्याने त्याला तात्काळ गडचांदूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.
 


         गडचांदूर येथील दवाखान्यात आणताच क्षणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दालमिया सिमेंट कंपनीतील सर्व युनियनचे पदाधिकारी व सर्व पक्षीय पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले असून सोबतच दालमिया कंपनीचे व्यवस्थापन कमीटी सुद्धा रुग्णालयात हजर असल्याची माहिती आहे. मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत स्थायी नौकरी व आर्थिक साहाय्य देण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व  कामगार संघटनेनी केली आहे. बातमी लिहीपर्यंत मृतक कुठून व किती उंचीवरून पडला हे माहित झाले नाही.

#death #korpana  #worker