🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पतीने केला पत्नीवर धारदार शस्त्राने वार.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चामोर्शी:- वासुदेव महेंद्र डे असे आरोपीचे तर माधुरी वासुदेव डे (२९ वर्ष) असे पत्नीचे नाव आहे. त्यांचे १४ वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून आरोपी हा पत्नी माधुरीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करायचा. दोन दिवसांपूर्वी आरोपी वासुदेव याने पत्नी माधुरी हिला मारून टाकण्याच्या उद्देशाने धारधार शस्राने तिच्या कपाळावर, डाव्या डोळ्याचे वर वार केले. त्यानंतर पत्नीला रक्तबंबाळ अवस्थेत ठेवून त्याने जखमी पत्नीच्या मोठ्या बहिणीला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. मी मुलांना घेऊन जात असल्याचेही तो बोलला.
जखमी माधुरीच्या बहिणीने आपल्या माहेरी फोन करून माधुरीच्या घरी जाऊन पाहायला सांगितले. नातेवाईक तिच्या घरी पोहोचले, पण घराच्या दरवाजाला बाहेरून कडी होती. कडी उघडून पाहिले असता बेडरूममध्ये गंभीर जखमी होऊन माधुरी पडलेली होती. नातेवाइकांनीं तिला चामोर्शीच्या सरकारी दवाखान्यात भरती केले. त्यानंतर डॉक्टरांनी गडचिरोलीला घेऊन जाण्यास सांगितले. तेथून माधुरीला नागपूरच्या मेडिकल कॉलेजला भरती करण्यात आले. सध्या नागपुरातच तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सादर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने सोमवार दि. २१ रोजी आरोपीविरुध्द कलम ३०७, ३४२ अन्वये गुन्हा नोंद केला. हल्लेखोर आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तपास पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत