Top News

कोरोनाने छत्र हरपलेल्या मोहुर्ले कुटुंबीयांच्या मदतीला धावले मुनगंटीवार.


आजी पालकमंत्र्यांच्या गावात माजी पालकमंत्र्यांची मदत.

खचलेल्या कुटुंबियांत जागविली जगण्याची उमेद.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- तालुक्यातील करंजी गावात कोरोनाने चांगलाच कहर केला.या लाटेदरम्यान गावातील चार व्यक्तींचा कोविडमुळे मृत्यू झाला.यात कुटूंबप्रमुख राहिलेल्या एकाच कुटूंबातील साईनाथ आणि मधूकर या दोन मोहुर्ले भावंडाच्या निधनाने अवघे समाजमन सून्न झाले.या कुटूंबावर आभाळ कोसळल्यागत स्थिती निर्माण झाली.अश्यावेळी कुटूंबातील कर्त्या पूरूषांच्या मृत्यूनंतर मोहुर्ले कुटूंबीयांची वाताहत होऊ नये,खचून न जाता नव्या उमेदीने त्यांना उभे राहता यावे,यासाठी राज्याचे माजी मंत्री,आमदार सुधिर मुनगंटीर मोहुर्ले कुटूंबीयांच्या पाठिशी उभे राहिले. रविवारी(दि.२०)त्यांनी या कुटूंबासाठी मदत पाठवली.माजी आमदार सुदर्शन निमकर,माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह भाजप पदाधिऱ्यांच्या उपस्थितीत ही भेट मोहुर्ले कुटूंबीयांना देण्यात आली.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात कोरोनाने चांगलाच कहर केला.तालुका प्रशासनाने हा गाव कंटेंनमेंट झोनही घोषीत केला होता.या लाटेदरम्यान गावातील चार व्यक्तींचा कोविडमुळे मृत्यू झाला.यात कुटूंबप्रमुख राहिलेल्या साईनाथ आणि मधूकर या दोन मोहुर्ले भावंडाच्या निधनाने अवघे समाजमन सून्न झाले.या कुटूंबावर आभाळ कोसळले.अश्यावेळी राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधिर मुनगंटीवार यांना ही बाब समजली.त्यांच्यातील हळवा माणूस जागा झाला.अन मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात रविवारी(दि.२०)भाजपच्या शिष्ठमंडळाने करंजी गावातील मोहुर्ले कुटूंबीयांची सात्वनपर भेट घेतली.आणि मोहुर्ले कुटूंबीयांना मदत देऊ केली.
यावेळी क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, दत्तप्रसाद महादानी, निलेश संगामवार, जि. प. सदस्य स्वाती वडपल्लीवार, पं.स.सदस्य भूमी पिपरे, नगरपंचायतीचे माजी सभापती राकेश पून, मनिष वासमवार, गोंडपिपरी नगरपंचायतीचे माजी उपाध्यक्ष चेतनसिंह गौर, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सुहास माडूरवार, करंजीचे ग्रा.पं.सदस्य समीर निमगडे, सुरेश श्रिवास्कर आदिंची उपस्थिती होती.

तालुका भाजपने स्विकारले शैक्षणिक पालकत्व....

करंजी गावातील कुटूंबप्रमुख राहिलेल्या मोहुर्ले बंधूंच्या निधनाने अवघे समाजमन सून्न झाले.परिस्थिती बेताची असल्याने कूटूंबावर आभाळ कोसळल्यागत स्थिती झाली.यामूळे मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून गोंडपिपरी तालुका भाजपच्या पदाधिऱ्यांनी पुढाकार घेतला.आपन मोहुर्ले कुटूंबातील मुलामुलींचे ईयत्ता १० वी.पर्यंतचे पालकत्व स्विकारत असल्याचे भाजपच्या चेतनसिंह गौर,राकेश पुन यांनी सांगितले.

आजी पालकमंत्र्यांच्या गावात माजी पालकमंत्र्यांची मदत.

करंजी गाव विद्यमान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची जन्मभूमी आहे.असे असतांना मात्र आजी पालकमंत्र्यांच्या गावात माजी पालकमंत्र्यांची मदत केल्याने हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने