जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

माझी उपजीविका समृध्दी व पोषण परसबाग मोहिमेचा शुभारंभ.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभूर्णा:- उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर येथे १५ जून ते १५ जुलै या कालावधीत उमेद अभियानाची खरीप हंगामातील कामांची प्रभावी अमलबजावणीसाठी "माझी उपजीविका समृध्दी मोहीम" व "पोषण परसबाग विकसन मोहीम" संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. याची सुरुवात १५ जून पासून तालुक्यातील दिघोरीं या गावात विविध उपक्रम राबवून सुरुवात करण्यात आलेली आहे. ही मोहीम उमेद अभियानातील प्रत्येक कुटुंबातील लोकांची उपजीविका समृध्दी करण्यासाठी व खरीप हंगामातील शेती कामे व पशुधन यावर होणारा अधिकचा खर्च टाळून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देवून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.

या मोहीमे दरम्यान बियाणांची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया करणे, सेंद्रिय निविष्ठा तयार करणे, सेंद्रिय डेमो युनिट तयार करणे, सामूहिक बी - बियाणे व खते खरेदी करणे, पशुधनाचे लसीकरण करणे, पोषण परसबाग विकसित करणे तसेच समूह संसाधन व्यक्तींची क्षमता बांधणी करणे इत्यादी उपक्रमे घेण्यात येणार आहे.
प्रत्येक उपक्रम प्रत्येक गावातील शेतकरी व पशुपालक यांच्या पर्यंत पोहचिण्यासाठी उमेद चे सर्व कर्मचारी व समूह संसाधन व्यक्ती कामे करीत आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तींचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी त्यांना सकस आहार मिळणे अत्यावशक आहे याकरिता प्रत्येक कुटुंबाने उमेद मॉडेलचे पोषण परसबाग लावणे गरजेचे आहे. तालुक्यामध्ये जवळपास ५०० पोषण परसबाग तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत.
हया दोन्ही मोहीमा यशस्वी राबविण्यासाठी वेळोवेळी गट विकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच तालुका कृषी कार्यालय व पशुसंवर्धन विभाग यांचे सुद्धा सहकार्य मिळत आहे.
मोहिमअंतर्गत जिल्हा कक्षाकडून प्राप्त झालेल्या भौतिक लक्षांक पूर्ण करून तालुक्यातील उमेद अभियानातील प्रत्येक कुटंबा पर्यंत ही मोहीम पोहचवून त्यांना या मोहिमे मध्ये सामावून घेण्यात येणार असल्याचे मत श्री.राजेश एम.दुधे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत