जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

वन्य प्राण्यांची शिकार करणारे तिघे अडकले वन विभागाच्या जाळ्यात.


क्षेत्र सहायक अरुण पालीकोंडावार यांची कारवाई.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभूर्णा:- वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याच्या गुप्त सूचनेवरून घोसरीचे क्षेत्र सहायक अरुण पालीकोंडावार व त्यांच्या चमूने गुप्त पाळत ठेवून या टोळी मधील तिघांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
पोंभुर्णा वनपरिक्षेत्रा अंतर्गत घोसरी उप क्षेत्रातील संरक्षित वन क्रमांक ५४७ (ए) मध्ये सस्याच्या अवैध शिकार प्रकरणी भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम -९, ५१ नुसार गुन्हा नोंद करून तीन आरोपींना अटक केली आहे.
आरोपी हे मूल तालुक्यातील नांदगाव येथील असून हे अनेक दिवसांपासून वन्यप्राण्यांची शिकार करीत होते. मात्र त्यांच्या मागावर टपून असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ते गवसत नव्हते. वनपरिक्षेत्राधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक अरुण पालीकोंडावार यांनी सापळा रचून दिनांक २२ जून २०२१ रोजी ही मोठी कामगिरी केली.
 
        अटक झालेल्या आरोपींमध्ये नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भास्कर राजेश्वर भंडारे, शंकर आळकु जाधव, स्वप्निल बाळू लोणारे सर्व राहणार नांदगाव यांचा समावेश असून त्यांचे कडून एक मृत ससा, सहा फासे, चाकू इत्यादी जप्त केले आहे.
           
       नांदगाव येथील १२ ते १४ लोकांची टोळी असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. परंतु या टोळीतील तिघे जण विभागाच्या जाळ्यात अडकल्याने इतर लोकांचेही धाबे दणाणले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत