शासनाने खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या धानाचे बोनस व चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करा:- अविनाश पाल.

Bhairav Diwase

सात दिवसाच्या आत जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- मागील वर्षभरापासून सर्वच जण कोरोनाशी लढा देत आहेत. शेतकरी बांधव सुद्धा कोरोनामुळे न डगमगता शेतीची कामे सुरूच ठेवली. त्यामुळे शेतमालाचे छान उत्पादन झाले आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागला. मात्र शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही बोनस ची रक्कम मिळाली नाही. परिणामी शेतकऱ्याची आर्थिक कोंडी झालेली आहे. त्यामुळे शासनाने बोनस व चुकाऱ्याची रक्कम त्वरित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी श्री. अविनाश पाल यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनने खरीप पिकातील धान (भात) शासकीय दराने खरेदी केले. धान खरेदी केलेल्या काही शेतकऱ्यांचे अजून पर्यंत त्या मालाचे बिल (चुकारे) मिळाले नाहीत. तसेच महाराष्ट्र शासनाने शासकीय खरेदी केलेल्या धानाला प्रती क्वि. ७०० रु बोनस जाहीर केले परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसचे एक हि रुपया जमा झालेला नाही. राज्यात कोरोनाचे संकट असताना शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. आज पेरणीची वेळ आली असताना त्यांचे बिल व बोनस न मिळणे हि एक शोकांतिका आहे. शेतकऱ्यांनी शेती कशी करावी. शेतकऱ्यापुढे दुसरा कोणता पर्याय नाही.
त्यामुळेसात दिवसाच्या आत शेतकऱ्यांचे थकीत बिल (चुकारे) व बोनस न मिळाल्यास तहसील कार्यालय सावली समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येईल व यात काही अपहार्य घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असा ईशारा अध्यक्ष भाजपा तालुका सावली तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा श्री. अविनाश पाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. विजय वड्डेटीवार, आमदार सुधीरभाऊ मुंगनटीवार तथा जिल्हाधिकारी साहेब यांनातहसीलदार सावली मार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी परशुराम भोयर प्र. सरपंच व्याहाड बुज. दिवाकर गेडाम ग्रामपंचायत सदस्य, अरविंद निकेसर, पुनम झाडे, तुळशीदास भुरसे आदी उपस्थित होते.