Top News

त्या भीष्म प्रतिज्ञेचे पालन 30 वर्षानंतरही सुरूच:- राजेंद्र गांधी.

स्वेच्छा रक्तदान शिबिराचा 19 वा दिवस.

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचा उपक्रम.

ओ.बि.सी.मोर्चाने केले रक्तदान.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भाजपाचे कार्यकर्ते 30 वर्षा पासून रक्तदान करीत आहेत.1980 ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली,तेव्हा जिल्ह्यातील कोणताही रुग्ण रक्ताच्या कमतरतेमूळे दगावणार नाही,अशी भीष्म प्रतिज्ञा विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांनी त्यावेळी घेतली आणि रक्तदानाच्या सेवा यज्ञाला सुरवात झाली.त्या भीष्म प्रतिज्ञेचे पालन आजही हजारो भाजपा कार्यकर्ते करीत आहुती देत आहेत. रक्तदानामूळे जवळच नातं निर्माण होते. असे प्रतिपादन भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी यांनी केले.ते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे आय एम ए सभागृहात आयोजित स्वेच्छा रक्तदान शिबिरात अध्यक्ष म्हणून गुरुवार(17 जून)ला बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,ओ बि सी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी,महामंत्री शशिकांत मस्के,ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वंदना संतोषवार, महिला मोर्चा महामंत्री सपना नामपल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी विनोद शेरकी म्हणाले,आ.मुनगंटीवार यांचे कार्य अतुलनीय आहे.50 कोटी वृक्षारोपण करून त्यांनी जगात लौकिक मिळून चंद्रपूरकरांच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला.त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे.आम्ही पक्षासाठी जगू व मरू, असे ते म्हणाले.
यावेळी,विनोद शेरकी,शशिकांत मस्के,शैलेश इंगोले,राजू भूषलवार,माणिक दांगी यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वतीने फेसशिल्ड व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष कासंगोट्टूवार यांनी तर शिबिर मुख्य संयोजक प्रशांत विघ्नेश्वर यांनी संचालन केले.ब्रिजभूषण पाझारे यांनी आभार मानले.यावेळी रितेश वर्मा,रामकुमार अकापेलिवार,शुभम शेगमवार,रोशन जोशी,विकास गोटे, सैयद शफी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने