Top News

"शिक्षक आपल्या दारी" उपक्रमा अंतर्गत विध्यार्थी प्रवेश.

मोफत पाठ्यपुस्तक ,शैक्षणिक साहित्य व मास्क देऊन विध्यार्थीचे केले स्वागत.

आदर्श शाळेतील शिक्षक बादल बेले यांच्या प्रवेशोत्सव उपक्रमाला विध्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सध्या संपूर्ण देशात कोविड -१९ या महामारीने भीतीचे वातावरण पसरले आहे. अश्यातच विध्यार्थीकरीता शारीरिकद्रुष्टीने प्रत्यक्ष शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील पालकांमधे दुविधा निर्माण झाली आहे. सत्र २०२१-२२ मधे शाळा सुरू होणार की नाही, शाळाच सुरू होणार नसतील तर विध्यार्थी प्रवेश कसे करायचे ,त्यांच्या शिक्षणाचे कसे होईल ,पाठ्यपुस्तका विषयीची चिंता ,ऑनलाईन शिक्षणाविषयीची माहिती अशा अनेक प्रश्नावर चर्चा करून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथील सहायक शिक्षक बादल बेले यांनी " शिक्षक आपल्या दारी " या उपक्रमा अंतर्गत ग्रामीण भागातील पालकांना भेटून त्यांच्या शंका नीरासन करीत विध्यार्थीचे शाळा प्रवेश करून घेत त्यांना मोफत पाठ्यपुस्तक ,शैक्षणिक साहित्य व मास्क भेट देऊन प्रवेशोत्सवाला प्रारंभ केला.


शैक्षणिक सत्र २०२१-२२ ची सुरुवात दिनांक २८ जून पासून होणार आहेत. त्यानुसार सध्या शाळेत फक्त शिक्षकांची उपस्थिति राहणार आहे. शाळेतील घंटा जरी वाजणार नसली तरी विध्यार्थी मात्र घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करणार आहे. अश्यातच इयत्ता पहिली व वेगवेगळ्या इयत्तेमध्ये दाखल पात्र विध्यार्थीना शाळेत प्रवेश घेत असतांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रशंनाचे निराकरण करणे आणि विध्यार्थीचे घरी जाऊन प्रवेश करणे यासाठी बादल बेले यांनी " शिक्षक आपल्या दारी " या उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी पालकांसोबतच विध्यार्थीचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दाखल पात्र विध्यार्थीचे प्रवेश करून त्यांना मोफत पाठ्यपुस्तके ,शैक्षणिक साहित्य व मास्क भेट देऊन त्या विध्यार्थीचे स्वागत केले जात आहे. सोबतच कोविड -१९ विषयी पालक म्हणून आपली जबाबदारी काय असली पाहीजे ,विध्यार्थीनी कशी काळजी घेतली पाहीजे ,तर शाळा प्रशासन सुधा आपली जबाबदारी कशी पार पाडणार आहेत याविषयी सविस्तरपणे माहिती देण्यात येत आहे.


कोविड -१९ च्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याच्या बातम्यामुळे चिंतेत पडलेल्या पालकांना व विध्यार्थीना एक शिक्षक म्हणून दिलासा देत आपण घ्यावयाची काळजी व नियमांचे पालन करणे तसेच लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना सकस आहार देणे याविषयी चे सुधा मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी कुठलीही चिंता व्यक्त न करता आपल्या आवडीनुसार विध्यार्थीचा शाळा प्रवेश करून घेण्याचे आवाहन यावेळी बादल बेले यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने