🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

गेल्या 24 तासात वीज पडून पाच शेतकऱ्यांचा मृत्यू तर घरावर विज पडून घराला आग. #Lightningstrikes


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली, आणि होत्याचं नव्हतं करून टाकले. जोरदार पावसाच्या सरींचा सह विजांचा कडकडाट झाला. गेल्या 24 तासात पाच शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर गोंडपीपरी तालुक्यातील मौजा नांदगाव फुर्डी येथील प्रदीप राजेश्वर भोयर यांच्या घरावर विजे पडून घराला आग लागली
चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून तीन जण ठार.

जिल्ह्यात बुधवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर तालुक्यातील सोनेगावच्या शेतात काम करीत असलेल्या गोवर्धन किशन गोहणे (वय ३५) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला; तर कोरपना तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भीमराव मारू मडावी (वय ४०) आणि कवडू मोहुर्ले (वय ३६) यांचा समावेश आहे.

नांदगाव फुर्डी येथे वीज कोसळून लागलेल्या आगीत घर जळून खाक.

गोंडपिपरी येथून जवळच असलेल्या नांदगाव फुर्डी येथील प्रदीप राजेश्वर भोयर यांच्या घराला सायंकाळी 4 वाजताच्या च्या सुमारास अचानक वीज कोसळून लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर जाळून खाक झाले आहे.
वीज पडून महिला-पुरुष व बकऱ्या ठार दोघे गंभीर जखमी.

मूल तालुक्यातील बोंडाळा गावात आज वीज पडून दोन शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृतक शेतकऱ्याचे नाव विलास केशव नागापुरे (५०) व गयाबाई पोरटे (६०) असे आहे.

⚡विजेच्या कडकडाटासह पाऊस होत असतांना, काय करावे व काय करू नये; जाणून घ्या.
👇👇👇👇👇👇

#Lightningstrikes #chandrapur #gondpipari #korpana #mul