🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वीज पडून महिला व पुरुष ठार दोन जखमी. #Lightningstrikes(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- आज तारीख 30 जून रोजी दुपारी अडीच वाजता चे सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसापासून आपला बचाव करण्याच्या हेतूने शेतातील काम आटोपून झाडांमध्ये थांबलेल्या चार जणांपैकी दोघांवर काळाने झडप घातली. आकाशातून मोठ्याने आवाज झाला व क्षणार्धात या चौघांवर वीज कोसळली. चौघांपैकी महिला व पुरुष हे दोघे ठार झाले असून दुसरे दोघे महिला व पुरुष गंभीर जखमी आहेत. 
जखमी असणाऱ्या पुरुषाची पत्नी या दुर्घटनेत मृत्त पावली आहे; तर जखमी असलेल्या महिलेचा पती या घटनेत स्वर्गवासी झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत दोन बकरी यांचाही मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये विलास केशव नागापुरे वय पन्नास वर्ष, गयाबाई नामदेव पोरटे वय 55 वर्षे राहणार बोंडाळा,त.मुल, जिल्हा चंद्रपूर यांचा समावेश असून ताराबाई विलास नागापुरे वय 45 वर्ष, नामदेव तानु पोरटे हे गंभीर जखमी असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय मुल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
   घटनेची माहिती मिळताच मुलचे नायब तहसीलदार श्री. पवार, नांदगाव साजा चे तलाठी श्री. मेश्राम व बेंबाळ पोलीस चौकीचे परचाके, गायकवाड, तितरमारे व जुमनाके हे घटनास्थळावर दाखल होऊन घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मूल येथे पाठविण्यात आले आहेत.
     या दुर्घटनेमुळे गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी व शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  #Lightningstrikes