गडचिरोली:- जिल्हयातील कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील विद्यार्थीनी कु.श्वेता उरकुडा घुटके (१६) ही सोमवार २८ जून २०२१ पासून बेपत्ता असून आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन कुटुंबियांनी केले आहे. याबाबत कुटुंबीयांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. #Disappeared #Gadchiroli
सदर बेपत्ता विद्यार्थीनी ही शिवाजी हायस्कुल कुरखेडा येथे इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेत असून तिचा वर्ण गोरा आहे ती बेपत्ता झाली तेव्हा पिवळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स लावलेली असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
याबाबत सोमवार २८ जून रोजी श्वेता घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार कुरखेडा पोलीस ठाण्यात २९ जून रोजी कुटुंबीयांनी दाखल केली असून कुठेही आढल्यास 9764531393 , 8830961224 , 7020368558 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले असून माहिती देणाऱ्यास रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. अधिक तपास कुरखेडा पोलीस करीत असून पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे.