आमदारांना निलंबित करणे म्हणजे विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होय. #BJP

भाजपा युवानेते महेश कोलावार यांचे वक्तव्य.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणे म्हणजे प्रामाणिक भूमिकेत असलेल्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होय,असे वक्तव्य भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी केले आहे.
महाराष्ट्र सरकारनी नुकतेच दि.५ जुलै ते ६ जुलै या दरम्यान दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशनाचे आयोजन केले होते.तर दि.५ जुलै रोजी झालेल्या विधानसभेच्या सञात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संदर्भातील मुद्दा उपस्थित झाल्यावर विरोधीपक्षाच्यावतीने प्रामाणिकपणे न्यायाची बाजू मांडणा-या १२ आमदारांना तालिका अध्यक्षांनी त्यांच्या बोलण्यास मज्जाव करीत थांबवण्याचा प्रयत्न केला.या गैरवर्तनाच्या विरुद्ध सर्व आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील बेल मध्ये घोषणाबाजी केल्यामुळे भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी सभागृहाच्या सञातून निलंबन केले आहे.तर ही कार्यवाही अतिशय लांचनास्पद असून हा एक प्रकारचा हुकूमशाही आहे.यामुळे देखील महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी आरक्षणाविषयी असलेले धोरण किती विरोधी भूमिकेत आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

एक तर महाविकास आघाडी सरकार
केवळ दोन दिवसाच्या अधिवेशनाचे सञ घेण्याचे निर्णय घेऊन विरोधी पक्षाच्याबाजूने प्रामाणिक हेतूने मांडणा-या प्रश्नांचे उत्तर न देण्यापासून दुर सारले आहे.वरुन सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात गेले असतांना संबधित मुद्दा मांडल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करुन त्यांना निलंबन करणे हे केवळ राजकीय कटाक्ष साधल्याचे दिसत आहे.याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो,अशीही भावना महेश कोलावार यांनी व्यक्त केले.  #BJP

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत