🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सरपंच अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेचे विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथे आयोजन. #Sarpanch #No-confidence #resolution


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मूल तालुक्यातील ग्रामपंचायत बेंबाळ येथील सरपंच यांच्या विरूध्द यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने अविश्वास ठराव समंत करण्यात आला होता. आता विशेष सभा घेऊन ग्रामसभेत गुप्त मतदान घेऊन सदर प्रस्तावाबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. यासाठी दिनांक 22/07/2021 रोजी सकाळी 10.00 वाजता जि.प.प्राथमिक शाळा, बेंबाळ येथे विशेष ग्रामसभेचे व त्यानंतर निवडणूकीचे आयोजन करण्यात आले होते. #Sarpanch #No-confidence #resolution
परंतू दिनांक 21/07/2021 रोजी झालेल्या पावसामुळे नियोजित ग्रामसभेच्या ठिकाणी ग्रामसभा घेणे शक्य नसल्याचे सं​दर्भिय पत्र क्रमांक 3 अन्वये कळविले आहे.
परंतु प्रस्तुत विशेष ग्रामसभा घेणे अनिवार्य असल्याने सदर ग्रामसभा जि.प.प्राथमिक शाळा, बेंबाळ येथे भरविण्या ऐवजी विवेकानंद विद्यालय बेंबाळ येथे भरविण्यात यावी. व या साठीची संपुर्ण व्यवस्था ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून करावी असे आवाहन अध्यासी अधिकारी तथा तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी केले आहे.