💻

💻

सुसंस्कृत, समाजसेवी व राजकारणी म्हणजे आशिषभाऊ. Birthda


निष्काम, निर्हेतुक व निस्वार्थ बुद्धीने सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून स्वकर्तुत्वाने व कर्तबगारीने सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आशिषभाऊ ताजने.

सर्वसामान्य व तळागाळातील व्यक्तींच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे,
तन-मन-धनाने जनकल्याणासाठी झटणारे,
उगवत्या नव्या दिवसागणिक व आपल्या प्रत्येक श्वासागणिक लोक कल्याणाचा ध्यास घेणारे, सर्वसामान्यांचा प्रश्न तो आपला प्रश्न,
सर्वसामान्यांच्या समस्या त्या आपल्या समस्या मानून ते सोडवण्यासाठी जिवाचे रान करणारे,
स्वतः व कुटुंबापेक्षा समाजहित महत्त्वाचे मानणारे, समाजमनाचा भान असणारे,
समाजसेवक म्हणजे आशिषभाऊ ताजने.

राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे,
राजकारणासाठी राजकारण नव्हे;
तर विकासाचे राजकारण करणारे,
निश्चित ध्येय-धोरण व इष्ट ते साध्य करण्यासाठी वाद नव्हे तर संवाद व समन्वय साधणारे, सुशासन प्रस्थापित करण्यासाठी झटणारे, प्रसंगी विरोध करणारे व विरोध पत्करणारे, परंतु तरीही राजकीय क्षेत्रात अजातशत्रु असणारे,
सुसंस्कृत, समाजसेवी व राजकारणी म्हणजे आशिषभाऊ ताजने.

शिक्षणाने शहाणपण व शहाणपणातून सुसंस्कृतपणा येतो हे जाणून,
सुशिक्षित संस्कारक्षम पिढी घडवू पाहणारे,
समाजाला शिक्षित व सज्ञान करण्याचे व्रत घेणारे, त्यादृष्टीने शिक्षण प्रसार - प्रचारासाठी झटणारे,
शिक्षणप्रेमी म्हणजे आशिषभाऊ ताजने.

आशिषभाऊ आपण सेवाभावी वृत्तीतून, मानवतावादी कृतीतून व अभिनव कार्यशैलीतून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील आपले कार्य केवळ उल्लेखनीयच नाही; तर सर्वांसाठी अनुकरणीय व प्रेरणादायी आहे. किंबहुना या क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्यांसाठी ते आदर्शवत आहे.
आपल्या कार्याचा व अतुलनीय योगदानाचा आम्ही मनापासून आदर करतो.
आपल्या हातून असेच लोककल्याणकारी,
सेवाभावी कार्य होत राहावे व त्यासाठी
आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपणास जन्मदिनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा....
  शुभेच्छुक - प्रविण भाऊ हेपट सचिव भूमिपुत्र युवा शेतकरी पुरुष बचत गट नारंडा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत