(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा : घरी एकटाच असल्याने बुधवारला सकाळी जेवणाचे डब्बे धुण्यासाठी बाथरूम मध्ये जात असताना राजकुमार रायलियु लियाला (४०) यांचा पाय घसरल्याने जागीच मृत्यू झाला.
राजकुमार लियाला हा रामपूर येथील मनोहर दुधारे यांच्या घरी पत्नीसह किरायाने राहून पेंटींग चे काम करीत होता, पत्नी मंजू प्रकृती ठीक नसल्यामुळे माहेरगावी गेली होती, राजकुमार हा एकटाच घरी होता. सकाळी घराचे दार हव्याने आदळत असल्याने घर मालकीण दुधारे यांनी राजकुमार यांना आवाज दिला असता प्रतिसाद न मिळाल्याने मनोहर दुधारे व शेजारचे घरात जाऊन पाहिले असता राजकुमार खाली पडून त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती राजुरा पोलिसांना दिली असता उपपोलिस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम, सहाय्यक पोलीस निरीक्षक साखरे, संपत पुलीपाक्का व इतर पोलीस कर्मी घटनास्थळी पोहचून तपास केला असता घरामध्येच असलेल्या बाथरूममध्ये जेवण केलेले खाली डब्बे ठेवून दिसले त्यामुळे डब्बे धुण्यासाठी जात असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.#Death