पाइपमध्ये दबून युवकाचा मृत्यू. #Death

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
खडसंगी:- चिमूर वरोरा राज्यमहामार्गावरील कब्रस्थानजवळ ठेवलेल्या पाइपमध्ये दबून गणेश वाल्मिक नैताम (३४) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. #Death
वरोरा या राज्य माहामार्गावरील हिंगणघाट वळणावर कब्रस्थानजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेच्या पाइपचा साठा अनधिकृतपणे ठेवण्यात आला आहे. बुधवारी खडसंगी येथील गणेश वाल्मिक नैताम हा युवक याठिकाणी उभा होता. यावेळी पाण्यामुळे अनेक पाइप एकावर एक घसरत जाऊन त्याच्या अंगावर पडले. या पाइपमध्ये दबून त्याचा मृत्यू झाला. #Chandrapur #chimur
सदर पाइप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना व एजीपीजी (पिंजवानी ) असोसिएशन अकोला या कंपनीचे असून, अनधिकृतपणे पाईप ठेवल्यामुळेच मृत्यू झाला असे गावकऱ्यांचा आरोप आहे. #Adharnewsnetwork