(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज मौजा माथरा येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही, कृषी विभाग राजुरा, ग्रामपंचायत खामोना यांच्या संयुक्त विद्यमानाने एक कुटुंब पाच झाड लावण्याचा शुभारंभ मा. सरपंच हरिदास झाडे यांच्या हस्ते लावून करण्यात आला, यावेळी अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे उत्पादक समन्वयक मा. विशाल भोगावर सरानी पर्यावरण समतोल व वृक्ष रोपणाचे महत्व याबाबत मौलिक असे मार्गदर्शन केले, गुलाबी बोण्ड अळी निर्मूलन बाबत कृषी सहायक वैशाली सोनटक्के मॅडम यांनी मार्गदर्शन केले.#Adharnewsnetworkयावेळी वृक्षरोपनासाठी झाडे मा. पोलीस पाटील सुरेश चहारे, कृषी सहाय्यक सोनटक्के व अंबुजा सिमेंट फाऊंडेशन च्या माध्यमातून उपलब्ध झाले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. सरपंच हरिदास झाडे, पोलीस पाटील सुरेश चहारे, सदस्य ग्रा.प.खामोना मारोती भाऊ चन्ने, सदस्य ग्रा.पं. खामोना अलका वैद्य ताई, अनिल डाखरे, जेष्ठ नागरिक वासुदेव लांडे, हरिचंद्र चहारे, श्रावण विधाते, दिलीप वैद्य, अतुल चहारे, वैभव लांडे, सचिन लांडे, गजु ताजने , मंगेश काळे, गणेश चहारे, सचिन लांडे, दिवाकर चहारे, सुभाष लांडे, शरद लांडे, दीपक पानपट्टे, सुधाकर ताजने, संतोष ताजने, महादेव जुनघरी, संतोष चहारे, रवी लांडे, बालाजी चहारे,, ज्ञानेश्वर बांधूरकर, शरद लांडे, महादेव चहारे, प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबूलवार, रुपेश गेडेकर, हेमराज साळवे, प्रदीप बोबडे, अश्विनी जेणेकर, रजनी खानोरकर व गावकरी उपस्थित होते.#Environment