(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- या महागाई च्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून जो 1 हजार रुपयाची तटपुंजी रक्कम मिळते ही रक्कम परवडण्यासारखी नसुन लगतच्या तेलंगणा आणि दिल्ली सरकारच्या धर्तीवर 3 हजार रुपये तिथलं सरकार देते. दिल्ली पेक्षा चार पटीने जास्त कर महाराष्ट्र शासनाकडुन केंद्र सरकारला दिला जातो. तर अडचण काय असा प्रश्न उपस्थित करत संजय गांधी निराधार योजनेचे विधवा, घटस्फ़ोटीत महिला, अंध, अपंग, मुखबधीर, दुर्जर आजाराने ग्रस्त लोकांना तसेच, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थीना दरमहिना 3000/- (तीन हजार रुपये) मासिक वेतन देण्यात यावे.
श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांच्या वयाची अट 60 वर्ष करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 51 हजार करण्यात यावे. या मागणीला घेऊन आम आदमी पार्टी राजुरा च्या वतीने तालुकाध्यक्ष रोशन येवले यांच्या नेतृत्वात जेष्ठ नेते श्री.मिलिंद गडमवार राजुरा विधानसभाध्यक्ष प्रदीप बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, बल्लारपूर शहरअध्यक्ष रवीकुमार पुसलवार, कोषाध्यक्ष आशीफभाई शेख, यांच्या प्रमुख उपस्थित राजुरा तहसिल कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकरी आघाडी प्रमुख स्वप्निल कोहपरे, संघटनमंत्री पवन ताकसांडे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद वांढरे, महादेव चापले, उपाध्यक्ष विलास निमलवार, मधुकर हजारे, चांद खान, सुरेश लोखंडे, श्रीवेनी दावा, ताहॆरा बेगम, सबा बेगम, तानेबाई लोखंडे, सखुबाई रामटेके, रजा बेगम, बानु दावा, शकुंतला मेंगरे, रीता झाडे, शोभा मेंगरे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते. #Honorarium