जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. #Accident(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबरी धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन च्या सुमारास कोरपना- आदिलाबाद महामार्गावरील जेवरा फाट्यालगत असलेल्या विदर्भ जींनिंग जवळ घडली.#Adharnewsnetwork
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक गजानन बुटेवाड (३५) रा. हळदा त. भोकर हा एमएच २५ डी ६३४५ सुपर स्प्लेंडर या दुचाकीने कोरपना कडे येत असताना अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली. यात तो जागीच मृत्यू पावला. सदर घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
आणि उर्वरित तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेदरम्यान महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली गेली होती. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे. #Accident

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत