Top News

राजुरा मादगी समाजातील मोहन ठरला पहिला वकील. #Advocate #lawyer


राजुरा:- गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली कडून घेण्यात आलेल्या विधी पदवी परिक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला. यामध्ये मुळचा राजुरा येथील रहिवासी मोहन लिंगाजी कलेगुरवार हा या परिक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. राजुरा तालुक्यातील मादगी समाजात विधीचे शिक्षण घेणारा हा पहिलाच युवक असून राजुरा मादगी समाजातील मोहन कलेगुरवार हा पहिला वकील ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल समाजामधून कौतूक व्यक्त केल्या जात आहे. #Advocate
मोहन कलेगुरवार यांचे वडील महसुल विभागात चतूर्थ श्रेणी कर्मचारी पदावर कार्यरत आहे. मोहन यांचे प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण राजुरा येथे अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीत झाले. त्यांनी पत्रकारीतेत पदविकेचे शिक्षण पूर्ण केले असून पत्रकारीता पदविकेते विद्यापिठातून तिसरा येण्याचा मान त्यांनी पटकावला होता. त्यानंतर त्यांनी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर येथून विधी पदवीचे शिक्षण घेतले. यात ते प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे. राजुरा येथे शिवाजी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतांना त्यांनी गोंडवाना विद्यापिठ विद्यार्थी परिक्षदेचा सदस्य म्हणून ही वर्षभर कारभार सांभाळला आहे. #Adharnewsnetwork
मोहन यांना मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती. अंजली हस्तक, उपप्राचार्य शेख सर, प्राध्यापक डॉ. अभय बुटले, डॉ. पंकज काकडे, डॉ. अश्विनी बलकी, ॲड. फरात बेग, ॲड. पंकज बजाज व अन्य प्राध्यापकांसह समाजातील बांधवांना दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने