जाहिरात... Advertisement... विज्ञापन

नागरिकांनी शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ घ्यावा, प्रमोद भगत यांचे आव्हान. #Chamorshi


निराधार सभेत १३३ प्रकरणे मंजूर.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- गरजू व निराधारांसाठी शासन स्तरावर केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजना राबविल्या जात आहेत, चामोर्शी तालुक्यातील पात्र लाभार्थी नागरिकांनी सदर योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले.
चामोर्शी तालुका निराधार योजनेची सभा प्रमोद भगत यांच्या अध्यक्षतेखाली ३० ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात पार पडली. सभेत १३३ प्रकरणे मंजूर करण्यात आले
सभेला संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आम्रपाली लोखंडे , गटविकास अधिकारी नितेश माने , विलास ठोंबरे , अमित यासलवार , अड. डिम्पल उंदिरवाडे , शंकर मारशेट्टीवार , लिपिक कु. देवांगना सहारे उपस्थित होते
     सभेत संजय गांधी अनुदान योजनेचे ४६ पैकी ४४ अर्ज मंजूर करण्यात आले २ नामंजूर झाले  , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेचे ९ पैकी ९ मंजूर झाले , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे ३४ पैकी ३४ अर्ज मंजूर झाले , श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे ५० पैकी ४६ अर्ज मंजूर  असून एकूण १३३ प्रकरणे मंजूर करण्यात आले आहेत तर ६ नामंजूर झाले आहेत.
       प्रमोद भगत आव्हान करताना पुढे म्हणाले की निर्धार वृद्ध व्यक्ती , अंध अपंग शाररिक व मानसिक आजाराने ग्रस्त , विधवा , देवदासी , अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसहाय करण्यासाठी त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विशेष सहाय योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी चामोर्शी तालुक्यात महाराजस्व अभियान तथा समाधान शिबिरातून जनजागृती करून , लाभार्थ्यांचे ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत , वयाची अट पूर्ण केलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रमोद भगत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत