जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वरील अतिक्रमण तक्रारी नियमात सुधारणा करा. #Gadchiroli #Chamorshi #sarpanch

ग्राम संवाद सरपंच संघटनेची मागणी.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या विरोधात अतिक्रमयाविषयी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या होत्या. संबंधित सरपंच ,उपसरपंच , सदस्य याचे मत जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. #Gadchiroli #Chamorshi #sarpanch
दरम्यान ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारक ग्रामपंचायत पदाधिकारी यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध अतिक्रमण नियमात सुधारणा करण्यासाठी शासन दरबारी ही समस्या मांडण्यात येणार आहे .
यावेळी ग्राम संवाद सरपंच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत , जिल्हाध्यक्ष दिवाकर मिसार , अशोक नैताम , दर्शना भोपये ,जालधर भोयर ,चंद्रकांत भोयर ,बंडू कनाके , आकाश निकोडे , संदीप भोयर ,धनराज भोपये यासह जिल्ह्यातील शेकडो सरपंच , उपसरपंच ,सदस्य उपस्थित होते . सध्या जिल्ह्यातील काही गावात ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या विरोधात विरोधी गटाकडून अतिक्रमनाबाबत तक्रारी केल्या जात असून यात काही गावातील सरपंच ,उपसरपंच , सदस्य अपात्र झाले आहेत माञ अतिक्रमण बाबत शासन निर्णयात सुधारणा करण्यासाठी ग्राम संवाद सरपंच संघटनेनी शासन दरबारी ही समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी यांना दिले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत