(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.सूरज भाऊ ठाकरे यांचा कार्याला प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील बरेच युवक महिला व कामगारांचा पक्षात प्रवेश जोरात सुरू आहे.#Adharnewsnetwork
आज दिनांक १ सप्टेंबर २०२१ ला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोरगरीबान करता झटणारी समाजसेविका म्हणून प्रख्यात असलेल्या बल्लारपूरच्या सौ. प्रिया ताई झांबरे व राजुरा शहरातील सुशिक्षीत, होतकरू, कर्तबगार तरुण श्री.अमित देविदासजी डांगे यांचा युवा स्वाभिमान पक्ष राजुरा मध्ये प्रवेश करण्यात आला..
त्यावेळी आल्वीन सावरकर, राहुल चौहान, आशिष यमनुरवार, अमोल ताठे, नावेद शेख, शोएब शेख, निखिल बजाईत, अजावान टाक, पवन चींतल व भूपेश साठोने उपस्थित होते.#Chandrapur